आनंदवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे ठप्प;
स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील मौजे आनंदवाडी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. चौदावा पंधरावा वित्त आयोग जेव्हापासून लागू झाला त्यामधील जवळपास ८० टक्के पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुप्त झाल्यामुळे गावात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही रस्ते, नाल्या, पिण्याचे पाण्याची गैरसोय घाणीचे साम्राज्य व सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वेळोवेळी या विरोधात आवाज उठवलेला आहे. ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी अशा सर्वांना अनेक वेळा चौदावा पंधरावा वित्त आयोगाची माहिती मागितलेली आहे परंतु माहिती तर देत नाहीत परंतु उडवा उडीचे उत्तर देऊन वेळ मारून आहेत. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्ती ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती अशा अनेक दुरुस्त्याच्या नावाखाली १४ वा १५ वा वित्त आयोगाचा निधी हा भ्रष्टाचाराच्या मार्गाने अनेक खात्यामध्ये वळवून तात्कालीन ग्रामपंचायत पासून आतापर्यंतच्या ग्रामपंचायतीने जनतेच्या पैशावर डाका मारणे तसेच यापुढे भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी. गावांतर्गत रस्ते नाल्या सांडपाणी व्यवस्थापन तसेच सर्व मिळणाऱ्या शासनाच्या सुविधा सरकारी नियमानुसार व्हाव्यात यासाठी आपण निर्देश द्यावे व होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा… असे दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्वर निवृत्ती केवारे यांनी म्हटले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






