आष्टी पोलिसांनी तब्बल ५१,३०,८८० रुपयांचा मुद्दमाल केला जप्त;
स्वराज्य वार्ता / राम राठोड
जालना/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा छुप्या पध्दतीने घेवून जाणाऱ्या आयशर ट्रकला आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. ही कारवाई २१ जुलै रोजी मध्यरात्री आष्टी – पाथरी रोडवरील सातोना टी पाँईटवर करण्यात आली. यावेळी पोलिसांनी २१ लाखाच्या गुटख्यासह एक ३० लाखाचा आयशर ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई या कारवाईमुळे गुटखा माफियांच्या झोपा उडाल्या. दरम्यान सदर गुटख्याचा साठा कोणी पाठविला व कुठे जात होता, याची निश्चीत माहिती पोलिसांना मिळाली नाही तर आयशर ट्रक चालक व किन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिल विषयी वृत्त असे की, एका आयशर ट्रकमधून घनसावंगीकडून नाशिककडे गुटख्याच्या साठ्याची वाहतूक होत होती. ही आयशर ट्रक (एम.एच.२०.सी.जी. ५८५४) आष्टी पोलिसांनी सातोना टी पॉईटवर थांबवून तिची तपासणी केली. त्यामध्ये गुटखा भरलेली पोती आढळून आली. पोत्यामध्ये विमल पान मसाला, व्हीवन सुगंधी तंबाखू, आरडी पान मसाला, एम सुगंधी तंबाखू अशा विविध कंपन्यांचे पुडे पोलिसांनी जप्त केले. यावेळी पोलिसांनी वाहन चालक कुणाल संतोषसिंग ठाकुर वय २१ वर्ष रा. राहुल नगर आब्दीमंडी दौलताबाद ता. जि. छञपती संभाजीनगर व किन्नर कडुबा रघुनाथ आसवार वय ३५ वर्ष रा. मालेवाडी दौलदाबाद ता. जि. छञपती संभाजी नगर यांना पोलिसांनी ताब्यात घेलते आहे. सदर वाहनांतून २१ लाख ३० हजार ८८० रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. तर २० लाखाचा जुना आयशर ट्रक पोलिसांनी आष्टी पोलिस ठाण्यात जप्त केला. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन जालना चे प्रशांत अजिंठेकर यांचे फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १८३/ २०२४ कलम २७५, १२३, २२३, ३ (५) भारतीय न्याय संहिता सह कलम ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि. सचिन इंगेवाड हे करत आहेत. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन इंगेवाड, पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार भिमराव राठोड, जाधव, कांदे, शेळके, पालवे, घाणे, काकडे, देवळे, पांढरे, पवार यांच्या पथकाने केली आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






