प्रहार संघटना ,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
परतूर / प्रतिनिधी : हनुमंत दवंडे
तालुक्यातील सेलगाव, आनंदगाव ,वाहेगाव(सोपारा) येणोरा, ढोनवाडी या भागातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रहार संघटनेची तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश लिपने, राजीव लिपणे, सर्जेराव लिपणे ,दत्ता मस्के, अनिल तौर ,शिवाजीराव लिपने, प्रकाश शहाणे,मुकुंदा लिपने, विकास लिपने,एकनाथ मस्के, विकास लिपने, रामभाऊ वैद्य, संतोष लिपणे ,गजानन परीतकर, कैलाश लीपणे,विलास सोनवणे, अमोल थोरात, तुकाराम थोरात, गोपाल लिपणे ,बालासाहेब लिपणे, लखन सोनवणे, सुरुंग सोनवणे, राम थोरात ,रामप्रसाद लिपणे, किशोर लिपणे व अंगलगाव येथील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच येणोरा येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता घोडे, विशाल घोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब घोडे, अशोक घोडे, अमोल घोडे, संतोष घोडे ,नामदेव घोडे ,आकाश घोडे, गणेश घोडे, सखाराम घोडे, खंडू घोडे , सचिन पाटोळे, दीपक पाटोळे,राहुल मोहिते व आदी येनोरा येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून व राष्ट्रवादी पक्षाला सोडून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, तसेच आनंदगाव येथील काँग्रेसचे बाळासाहेब मोरे, वाहेगाव (सोपारा)चे ओमप्रकाश वाघमारे, आसाराम वजारे , धोनवाडीचे कोंडीराम नाटकर, आनंदगावचे गौतम मोरे, सुनील मोरे, राहुल पाईकराव, सतीश मोरे ,शाश्वत लहाने, धोंडीराम नाटकर, दत्ता घोडे, इत्यादींनी काँग्रेस आय ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, प्रहार संघटना यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला.सदर प्रवेश सोहळा परतूर शहरांमध्ये शिवसेना कार्यालय परतूर मध्ये संपन्न झाला ,याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले , विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, भटके विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी तरवटे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश कापसे,उपतालुकाप्रमुख नितीन राठोड , परतुर शहर प्रमुख दीपक हिवाळे , श्रीराम कसाब, खंडू रुपनर, अल्पसंख्याक आघाडीचे शेख खाजा ,शहर प्रमुख प्रणय मोर यांच्यासह अनेक पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व कार्यकर्त्यांना भगवे रुमाल घालून भगवा ध्वज देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतले व आपापल्या भागात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नोंदणी बुथ संकलन शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे असे मोहन अग्रवाल यांनी सांगितले या सर्वांचे मनःपूर्वक यांनी शिवसेनेत जाहीर स्वागत केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






