लोहा प्रतिनिधी लोहा तालुक्यातील शेवडी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते गजानन चावरे यांची राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महाराष्ट्र 24 मराठी न्यूज च्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक सचिव गजानन चावरे यांना समाज रत्न पुरस्काराने द गौरविण्यात येणार आहे. गजानन चावरे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा, असे आहे. या पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष आहे. झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक सचिव यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात अन्याय अत्याचार च्या विरोधात ते ज्वलंत काम करत असतात त्यांनी अनेक आंदोलन करून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकांना उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना पुणे येथील एका आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. समाज रत्न पुरस्काराचे मानकरी गजानन संभाजी चावरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






