प्रतिनिधी हनुमंत दवंडे
न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल मध्ये आणि ज्युनिअर कॉलेज परतूर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य अवतरले पंढरपूर… न्यू वंडर इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्याकडून आषाढी एकादशी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरणुकीत सर्व वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनिनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून ह्या मिरवणुकीचे आयोजन संस्थे तर्फे आयोजित करण्यात आले होते. वारकरी सांप्रदायाच्या विविध वेशभूषा करून जसे की विठ्ठल, रखुमाई, काष्टा पातळ, धोतर टोपी विद्यार्थी व विद्यार्थिनी करून आले होते. संस्थेचे अध्यक्ष नारायण दादा सोळंके यांनी या मिरवणुकीचे उद्घाटन केले होते. या वेळी बोलताना नारायण दादा म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे जतन करून तो ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवणे व त्याचे महत्त्व पटवून देणे हे जुन्या पिढीचे काम आहे. अश्या संस्कृतीचे जतन सामूहिक प्रयत्नांतून लवकर फळास येत असतात असे ते म्हणाले. हि मिरवणूक बालाजी नगर, रेल्वे स्टेशन, महादेव मंदिर, तहसील मार्गे विठ्ठल मंदिर येथे पोहचली. मंदिरात भक्ती गीते गाऊन तसेच फुगडी वगैरे इत्यादी खेळ करून त्याची सांगता केली. ह्या कार्यक्रमाची संपूर्ण नियोजन प्रिन्सिपल साम वर्गीस आणि प्रशांत वे डेकर यांनी केले तर सर्व शिक्षक वृंदानी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






