राणा सांगा

राणा सांगा (जन्म :१२ एप्रिल १४८२ – मृत्यू :३० जानेवारी १५२८),
राणा सांगा: तलवारीच्या धारेवरून इतिहास लिहिणारा मेवाडचा सिंह!
एक वेळ होती, जेव्हा राजपुतानाची वाळवंटं रणभूमी बनली होती आणि प्रत्येक घोड्याच्या टापांनी माती थरथर कापत होती. युद्धाचा गंध हवेत दरवळत होता आणि एक नाव सर्वत्र गर्जत होतं ते म्हणजे राणा सांगा!
ते एक असे योद्धा होते ज्यांच्या शरीरावर ८० पेक्षा जास्त जखमा होत्या, एक डोळा नव्हता, एक हात नव्हता, आणि तरीही ते इतिहासाच्या पानांवर शौर्याचं दुसरं नाव बनून कोरले गेले.
१४८२ साली राजा रायमल आणि राणी रतन कुंवर यांच्या पोटी राणा सांगाचा जन्म झाला. सिसोदिया वंशातील हे राजपुत्र लहानपणापासूनच निर्भीड होते. पण त्यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षांनी भरलेलं होतं. आपल्या भावांशी सत्तेसाठी झगडताना त्यांनी एक डोळा गमावला, पण तेव्हाच त्यांनी सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याची शपथ घेतली.
राणा सांगा १५०८ ते १५२८ या काळात मेवाडचे राजा होते, पण त्यांचं साम्राज्य केवळ चित्तोडगडापुरतं मर्यादित नव्हतं. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, सिंध आणि उत्तर प्रदेशचे काही भाग त्यांच्या साम्राज्याच्या अधीन होता.
सांगा केवळ राजा नव्हते तर ते एक प्रेरणा होते. त्यांनी लोदी घराण्याविरुद्ध खतोली, धोलपूर आणि रणथंभोर येथे ऐतिहासिक विजय मिळवले. माळवा आणि गुजरातसारख्या सल्तनतींना आपल्या तलवारीच्या जोरावर नम्र केलं. गाग्रोनची लढाई असो की इदरच्या संघर्षातली मदत सांगा कुठेही गेले आणि विजय त्यांच्या पावलांच्या मागे चालत आला. पानिपतच्या लढाईनंतर बाबरशी थेट भिडणारे राणा सांगा एकटेच होते. बायनाच्या युद्धात मुघलांवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी खानवा येथे बाबरला सामोरे जाण्याचं ठरवलं. परंतु युद्धादरम्यान त्यांना जखमी केलं गेलं आणि विश्वासघाताने बाजूचे सैनिक बाबरकडे वळले. तो पराभव होता परंतु धैर्याचा आणि नेतृत्वाचा अजरामर इतिहास ठरला.
सांगा यांना त्यांचे मेहुणे पृथ्वीराज सिंह पहिला कछवाह आणि मारवाडचे मालदेव राठोड यांनी बेशुद्ध अवस्थेत युद्धभूमीवरून नेले.
पराभव स्वीकारणं राणा सांगा यांच्या स्वभावात नव्हतं त्यामुळे त्यांनी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी बाबरला पराभूत करून दिल्ली जिंकल्याशिवाय चित्तोडला परत न जाण्याची शपथ घेतली . त्यांनी पगडी घालणे देखील बंद केले आणि डोक्यावर कापड गुंडाळत असत. बाबरविरुद्ध दुसरे युद्ध करण्याच्या तयारीत असताना , बाबरशी पुन्हा संघर्ष नको असलेल्या त्यांच्याच सरदारांनी त्यांना विषबाधा केली. राणा सांगा काल्पी येथे धारतीर्थे पडले, पण आपल्या पश्चात एक परंपरा सोडून गेले. शौर्याची, संघटनेची आणि अखंड हिंदवी साम्राज्याच्या स्वप्नांची! इतिहासकार त्यांना उत्तर भारतातील शेवटचा स्वतंत्र हिंदू सार्वभौम मानतात. जिझिया कर रद्द करणारे, राजपुताना एकत्र करणारे आणि बाबरसारख्या आक्रमकाला आव्हान देणारा सांगा हे एक काळाचा झंझावात होते, एक इतिहास बनवणारा योद्धा होते.
आजही चित्तोडगडच्या तटांवर उभं राहिलं की इतिहासाच्या दर्याफुलांमधून त्यांचं नाव ऐकू येतं. राणा सांगा एक असा राजा ज्यांनी रक्ताच्या बदल्यात सन्मान जिंकला, आणि पराभवातही आपली महती अमर केली.
“रक्त सांडून स्वाभिमान जपला, रणधुरंधर वीर,
राणा सांगा नाव घेता पडते अभिमानात भर,
पराक्रमाने ते गाजले , इतिहासात झाले अमर!”
वीर यौद्धा राणा सांगा यांना नमन !
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल